December 2025



Team Images
Team Images

Team Images



भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर काँट्रिब्युशन सोशल क्वीन (उत्कृष्ट समाजसेविका) पुरस्कार २०२५



आज मला दिनांक २४ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर काँट्रिब्युशन सोशल क्वीन (उत्कृष्ट समाजसेविका)पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आपल्या राज्याचे केंद्रीय मंत्री श्री रामदास जी आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. त्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻 मानते. हा पुरस्कार म्हणजे आम्ही आतापर्यंत केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची, कामांची पोचपावतीच म्हणावी लागेल. हा पुरस्कार केवळ माझ्या एकटीचा नाही ह्यात मार्गदर्शक म्हणून माझे पती श्री योगेश नारायण तांबोळी आणि सासूबाई श्रीमती सीमा नारायण तांबोळी देखील सहभागी आहेत. माझे सासरे कै. नारायण लक्ष्मण तांबोळी ह्यांचा आम्हाला मिळालेला आशीर्वाद आणि त्यांचे पाठबळ आमच्या पाठीशी आहे. ज्यांच्या नावाची ही संस्था कै. नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे त्यामरफत आम्ही सर्व सामाजिक कार्य राबवतो. आमच्या सर्व कार्याची दखल घेऊनच ह्या पुरस्कार प्राप्त झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻



November 2025


Team Images
Team Images

Team Images
Team Images
Team Images

Team Images
Team Images


गाढेश्वर शाळेत सुरू झाला अनोखा उपक्रम



मा. नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था- नेरे यांच्या माध्यमातून श्री. योगेश तांबोळी साहेब व सौ. हर्षला तांबोळी मॅडम यांच्या सहकार्याने गाडेश्वर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा वाढदिवस यापुढे शाळेमध्ये केक कापून साजरा केला जाईल. तसेच त्या विद्यार्थ्याला नवीन ड्रेस व सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जाईल. हा उपक्रम या पुढील काळात नियमित सुरू राहील. सदर उपक्रमाची सुरुवात आज पासून इयत्ता पहिलीतील मायरा संजय चौधरी या विद्यार्थिनीच्या वाढदिवसाने झाली. योगायोग असा की आज सौ. हर्षला तांबोळी मॅडम यांचा देखील वाढदिवस होता. त्यामुळे आज या उपक्रमाची सुरुवात सौ.तांबोळी मॅडम व कु.मायरा या दोघींच्या वाढदिवसाचा केक कापून झाली.. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सौ. तांबोळी मॅडम व कु. मायरा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व मॅडमला स्वहस्ते बनवलेले भेट कार्ड दिले. या उपक्रमाबद्दल मा.नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था- नेरे चे सर्वेसर्वा श्री. तांबोळी साहेब व सौ. तांबोळी मॅडम यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले..



Team Images
Team Images

Team Images
Team Images
Team Images

बालदिन - रा. जि. प. शाळा – गाढेश्वर

आज बाल दिनाचे औचित्य साधून कै. नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था - नेरे माध्यमातून दरवर्षी च्या नित्यनियमाने आमच्याकडून गाडेश्वर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच बाल दिनानिमित्त पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व सर्व विद्यार्थ्यां समवेत केक कापला.
आम्ही एक उपक्रम हाथी घेतला आहे तो म्हणजे त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो त्या दिवशी आमच्या कडून त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ज्याचा/जीचा वाढदिवस असेल त्याना एक ड्रेस, केक, देऊन वाढदिवस साजरा केला जाईल आजच्या दिवसाची आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या शाळेत ३ दिवसांपुर्वी तिथल्या एका शिक्षिकेचा वाढदिवस होता त्यांनी मुलांसाठी अननस फ्लेवर चा केक आणला, पण मुलांना चॉकलेट केक खायला हवा होता मुलांनी शिक्षकांना सांगितले की आम्ही आमचे पैसे गोळा करून देतो आणि तुम्ही आम्हाला केक आणून द्या, आम्ही पण अचानक आज चॉकलेट केक घेऊन गेलो आणि मुले इतकी खुश झाली ते पाहून आमच्या अंगावर शहारे आले. देवाचीच इच्छा असेच कार्य आमच्या कडून घडुदे हीच सदिच्छा.🙏🏻💐🙏🏻🎉



Team Images
Team Images

Team Images
Team Images
Team Images

कै.नारायण लक्ष्मण तांबोळी यांची १४ वी पुण्यतिथी

कै. नारायण लक्ष्मण तांबोळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आज पुन्हा एकदा नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे तर्फे स्व. नारायणजी तांबोळी यांच्या पुण्यतिथी निमित्त करूणेश्वर ओल्डेज केर हाऊस आणि साई आश्रया वॄध्दाश्रम सेवाभावी संस्था ह्या दोन्ही आश्रमातील निवांसीना फळे वाटप करण्यात आली..... 🙏🙏असेच आशीर्वाद आमच्यावर सदैव असू दे. आश्रमात फळ वाटप म्हणजे सामाजिक किंवा धार्मिक कार्याचा भाग म्हणून वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा इतर आश्रमांमध्ये फळे वाटणे.

उद्देश: लोकांना फळे आणि अत्यावश्यक वस्तू पुरवून त्यांची सेवा करणे, त्यांचे समाधान करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हा प्रत्येकवेळी प्रयत्न करतो हाच या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.


October 2025


दिवाळीच्या या मंगल प्रसंगी आदिवासी पाड्यातील गरजू कुटुंबांना आणि वृद्धाश्रमात दिवाळी फराळ वाटप

नमस्कार 🙏🏻
वर्ष ६ वे
🌸✨ आनंदाची दिवाळी – गोडवा आणि आपुलकीची वाटणी ✨🌸
दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी साजरी केली. दिवाळी फराळ आश्रमात वाटला
दिवाळीच्या या मंगल प्रसंगी आमच्या तर्फे वृद्धाश्रमात, आदिवासी पाड्यातील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. 🪔
सणाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण तो इतरांसोबत वाटतो. 💫
फराळ बनवण्याची ऑर्डर दरवर्षी आम्ही आपल्या समाजातील संगिता लाड काकींना देतो जेणेकरून त्यांनाही मदत होते
गोड पदार्थांसोबत प्रेम, आनंद आणि आपुलकीही वाटली – हीच खरी दिवाळीची भावना! ❤️
सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏


August 2025


भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकाराने उरण तालुक्यातील युवक-युवतींसाठी आज भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता.

नामांकित कंपन्या इथे उपस्थित होत्या जसे की Blinkit, CEAT, Interio, HDFC, SBI, Kotak, Axis Bank, Tata Strive, ICICI Bank इत्यादी उपस्थित आहेत.

ज्या तुम्हाला केवळ नोकरीच नाही तर प्रगतीची दिशा देतील.आजची संधी हातातून जाऊ देऊ नका – आत्मविश्वासाने, तयारीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे या असे आव्हाहन मा.आ.श्री.बाळाराम पाटील साहेब ह्यांनी केले.

श्री.अतुल नंदकुमार म्हात्रे साहेब (शेकाप महाराष्ट्र राज्य खजिनदार तसेच शिवराज संघटना प्रमुख) यांनी हि खुप छान संकल्पना व रोजगार संधी आज तरुण तरुणींसाठी आणली व खास करुन तरुणींचा महिलांचा उर्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.मुलगी शिकली प्रगती झाली आणि ती प्रगती होताना जेव्हा दिसते तेव्हा अभिमान वाटतो.आणि ह्या कार्यात श्री.अतुल म्हात्रे साहेबांचा मोलाचा वाटा आहे.म्हणुन श्री.अतुल म्हात्रेसाहेब ह्यांच्या कार्यास लाल सलाम 👏🏻 तसेच ह्या रोजगार मेळाव्याचे आयोजक श्री.रवी घरत (तालुका चिटणीस उरण), श्री.नरेश घरत (महाराष्ट्र राज्य सदस्य), श्री.रमाकांत पाटील(उरण विधानसभा अध्यक्ष), श्री.विजय कडु (युवक अध्यक्ष उरण तालुका),श्री.दत्ता घरत ह्यांचे खुप खुप आभार.💐




Team Images
Team Images
Team Images

Team Images


पोल खोल धडक मोर्चा

जनतेची दिशाभूल बंद करा, "शास्ती" नव्हे तर "मालमत्ता कर" माफ करा.



Team Images
Team Images
Team Images

Team Images


पनवेल महानगर पालिका जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शेकाप पक्षाचा गौरवशाली ७८ वा वर्धापन दिन – इतिहास घडवणाऱ्या प्रवासात एक पाऊल माझंही! माझी पनवेल महानगर पालिका जिल्हा महिला आघाडी म्हणून निवड करण्यात आली



Team Images
Team Images
Team Images


आज रायगड जिल्हा वैश्य वाणी समाज संघातर्फे चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्यात रायगड जिल्हा महानगरपालिका शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सौ. हर्षला योगेश तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल सौ हर्षला योगेश तांबोळी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला



July 2025


Team Images
Team Images
Team Images

Team Images

Team Images

Team Images


→ श्री नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था – नेरे आयोजित वह्या वाटप कार्यक्रम, रा. जि. प. शाळा, गाढेश्वर




May 2025


Team Images
Team Images
Team Images

Team Images


→ Inspiring Woman Achiever Award by Queen Book in Colombo, Sri Lanka.




April 2025


Team Images
Team Images
Team Images

Team Images

Team Images

Team Images


→ भानघर गावातील करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊसला भेट देऊन फळ वाटप आणि वृद्धांशी हितगुज





Team Images
Team Images
Team Images

Team Images


→ मा. हर्षला योगेश तांबोळी आदर्श समाजसेविका खारघर, यांचा दैनिक मीडिया वार्ता न्यूज आयोजित, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार २०२५ प्रदान सोहळा.




March 2025


Team Images
Team Images
Team Images

Team Images

Team Images

Team Images


→ पनवेल सांस्कृतिक प्रबोधिनी,को.ए.सो. इंदुबाई आ.वाजेकर इंग्रजी माध्यम शाळा,येवनेट मल्टिमीडिया प्रा लि आयोजित पालक व शिक्षक सांस्कृतिक सोहळा २०२५ आनंदवारी काल उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आमची उपस्थिती होती. पालक आणि शिक्षक यांची चांगली सांगड घातली गेली होती. त्यावेळी माझ्याबरोबर स्टार प्रवाह वाहिनी मधील "आई कुठे काय करते" या मालिकेमधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सर, सौ चित्रलेखा खातू (महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी लेखिका,वित्तीय सल्लागार), विजय कदम सर (सह्याद्री वाहिनी वरिष्ठ निरीक्षक) आणि प्रज्ञा म्हात्रे (पत्रकार लोकमत) उपस्थित होते 🙏🏻🎉💐





Team Images
Team Images

Team Images
Team Images

Team Images


→ आज विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, वावोशी व खालापूर पोलिस ठाणे अंतर्गत वावोशी पोलिस दूरक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रीत्वाचा गौरव सोहळा माननीय पी एस आय श्री आलोक खिसमतराव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन खूपच छान करण्यात आले होते कशाचीही कमी नव्हती.मुख्यता त्यांनी मला लक्षात ठेवून मला सन्मानित केले आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. त्यांचे मार्गदर्शन समाजात नेहमीच लागत आले आहे पण आज स्त्रियांचा सन्मान करण्याचं जे काम केलं आहे त्या साठी त्यांचे विशेष कौतुक आहे . तुमच्या हातून अशीच अनेक कार्य पुढे घडू देत हीच प्रार्थना करते.🙏🏻💐🙏🏻



Team Images
Team Images
Team Images

Team Images

Team Images

Team Images


As Cheif Guest at Annual Function of School of Nursing L. T. M. G. Hospital Sion

नर्सिंग एक अत्यंत आदरणीय आणि महत्वपूर्ण क्षेत्र आहे. नर्सेस केवळ रुग्णांची काळजी घेत नाहीत, तर त्यांच्या जीवनातील कठीण क्षणांमध्ये आशेचे दीपस्तंभ बनतात. एक नर्स केवळ औषध देत नाही, तर माणुसकी, सहानुभूती आणि सेवा भावना आपल्यात रुजवते

नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केलेले कठीण परिश्रम आणि समर्पण हे निस्संदेह स्तुत्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट असतो, आणि तुमचं शिक्षण, तुमचा अनुभव तुमचं भविष्य घडवणार आहे. तुमचं कार्य केवळ रुग्णांच्या देखरेखीपर्यंत मर्यादित नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य करते.

तुम्ही जे शिकत आहात, ते नुसते ज्ञान नाही, तर एक जबाबदारी आहे. एक नर्स म्हणून तुमचं कार्य रुग्णांची केवळ शारीरिक मदत करणेच नाही, तर मानसिक आणि भावनिक आधार देणे हे सुद्धा आहे. तुमच्या कर्तव्याचा, तुमच्या कार्याचा समाजावर खोलवर परिणाम होतो.

आज या मंचावर असलेल्या प्रत्येकाला, मी तुमचं भविष्य उज्ज्वल असो, अशा शुभेच्छा देते. तुमचं शिक्षण, तुमची मेहनत आणि तुमच्या कार्याचे महत्त्व केवळ याच कॉलेजपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर तुम्ही समाजाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहात.

धन्यवाद! 🙏🏻💐🙏🏻👍👌🏻




January 2025


Team Images
Team Images
Team Images

Team Images

Team Images

Team Images


→ सिमा नारायण तांबोळी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ नेरे येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन




December 2024


Team Images
Team Images
Team Images

Team Images


Our 10th Eye check up camp was successfull - 08/12/2024
“कै.नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेरे येथे नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर”
आमाच्या येथे महाकाल मंदिराला ह्या वर्षी ५ वर्ष पूर्ण झाली. दर महिना हे शिबिर नेरे येथे असते पण ह्या महिन्यात पत्ता बदलून ते शिबिर महाकाल मंदिराला ५ वर्षे पूर्ण होत असल्याने उसरली येथे आयोजित केले होते . कै.नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध ठिकाणच्या एकूण १२० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३० रुग्णांना तपासणी दरम्यान मोतीबिंदू आढळल्याने त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.




November 2024


Team Images
Team Images
Team Images

Team Images

Team Images


→ नारायण लक्ष्मण तांबोळी म्हणजेच आपल्या सर्वांचे अण्णा यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्थे तर्फे नेरे भानगर येथे वृद्धाश्रमात जाऊन लाडू वाटप केले




August 2024


Team Images
Team Images
Team Images

Team Images

Team Images


→ पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे 15 ऑगस्ट रोजी पनवेल तालुक्यातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना, नागरिकांना 33 सायकलचे वाटप करण्यात आले.




Team Images
Team Images
Team Images


स्त्री शक्ती पुरस्कार २०२४ सन्मानित
डॉक्टर श्रुती शाम म्हात्रे यांच्या एकता कॅटलिस्ट च्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम होत असतात पहिल्यांदाच खास महिलांसाठी एकता कॅटलिस्ट आयोजित मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले होते, घडलेल्या घटनेबाबत आदरांजली तसेच निषेध व्यक्त करण्याकरिता दोन मिनिटं सभागृहातील सर्व महिलांनी मौन पाळले व त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची जोरदार सुरुवात झाली. आयोजक श्रुतीताई म्हात्रे, सौ हर्षला ताई तांबोळी, सौ.माया अहिरे,सौ. शशिकला सिंग, सौ.विशाखा पाटिल , पटेल ज्वेलर्स पनवेल शाखेच्या सौ काव्या भंडारकर , गिफ्टिंग पार्टनर प्रिशा सारी च्या सौ अर्चना खरात, गिफ्टिंग पार्टनर मीना एलिमेंट्स चे श्री मंदार पोतदार , गिफ्टिंग पार्टनर खातू मसाले च्या सौ शुभदा घाणेकर , कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन करणारे मंदार काणे एंटरटेनमेंट चे श्री मंदार काणे या सर्वांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्याचसोबत वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.एकूण १२ महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. ही गोष्ट खरंच कौतुक करण्यासारखी आहे की एका स्त्री कडून दुसऱ्या स्त्री चा सत्कार होणे.माझ्या कामाची दखल घेऊन तुम्ही पुरस्कार दिला मनापासून धन्यवाद




Team Images
Team Images
Team Images


As a chief guest
एखाद्याचं कौतुक करणं ही आपल्या व्यक्तिमत्त्वात मधली सर्वात सकारात्मक गोष्ट आहे... आणि ती व्यक्त सुद्धा केली पाहिजे... त्यामूळ कौतुक करणारा आणि कौतुक स्वीकारणारा सुद्धा श्रेष्ठ होतो....😊😊🙏🏻🙏🏻 प्रमुख उपस्थिती टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव , टायगर ग्रुप मुंबई अध्यक्ष पै संजय भाऊ खंडागळे होते. आयुष्यातील पुढच्या टप्प्यावर तु आत्मविश्वासाने पुढे जाताना एक धैर्यवान पाऊल उचलले आहे. सर्व क्षेत्रातील यशाचा मार्ग तुझयासाठी खुला होउदे तुझे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.



March 2024


Team Images
Team Images
Team Images


→ Received ASTITVA Naari Sanman AWARD 2024 season -1 presented by KALaSH Entertainment On the occasion of women’s day celebration.




Team Images
Team Images
Team Images

Team Images
Team Images
Team Images


→ झी 24 तासचा पुरस्कार पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या हस्ते स्वीकारला..




Team Images
Team Images
Team Images


Our 3rd Eye check up camp was successfull. “कै.नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेरे येथे नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर” कै.नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध ठिकाणच्या एकूण ५५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ रुग्णांना तपासणी दरम्यान मोतीबिंदू आढळल्याने त्यांच्यावर ऊद्या (ता. ४/०३/२०२४) मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.




February 2024


Team Images
Team Images
Team Images

Team Images
Team Images

Our 2nd Eye check up camp was successfull. “कै.नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेरे येथे नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर” कै.नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध ठिकाणच्या एकूण ८३ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१ रुग्णांना तपासणी दरम्यान मोतीबिंदू आढळल्याने त्यांच्यावर ऊद्या (ता. ३/०२/२०२४) मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.




Team Images
Team Images
Team Images

Team Images
Team Images
Team Images


As Special Guest & Judge at NCRD’s Sterling School – CBSE, Nerul for the evenr KIDS IN WONDERLAND Inter – School Competition for Pre-Primary students across Nerul. The objective of this event is to enhance the talent of Pre-Primary Kids, to recognize the Pre-Primary schools and to create a friendly bonding with the kindergartens in the vicinity.



January 2024


Team Images
Team Images
Team Images

Team Images
Team Images
Team Images


→ नेरे येथे मोफत महाआरोग्य शिबीर, औषधे, उपचार व नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद सीमा तांबोळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिबिराचे आयोजन योगेश दादा तांबोळी यांच्या आई आणि हर्षला वहिनी यांच्या सासूबाई सीमा आई तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिर,उपचार, औषधे वाटप आणि नेत्र तपासणी, ईसीजी, एक्सरे शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नेरे येथे आयोजित या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, काशिनाथ पाटील, सुरज हॉस्पिटलचे डॉ. आर एन पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, देवा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित लाभली. अनेक नागरिकानी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली. अनेकांनी शिबिरात सहभाग घेतला. जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतला. आजच्या शिबिरात वैश्य वाणी समाजातील अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. उत्सव मूर्ती आणि ज्यांचा आज वाढदिवस होता त्या सीमा आई तांबोळी यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना...


Team Images
Team Images
Team Images

Team Images

→ आपल्या जीवनात पद मिळण्याचा आनंद क्षणिक असतो, मात्र उपचाराने बरे झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून मिळणारा आनंद हा खरा आनंद असतो आणि आरोग्य सेवा देणे आणि रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा आहे, काल महाआरोग्य शिबिर पार पडले, पण तिथेच न थांबता काल हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट झालेल्या रुग्णांची आज भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली,फळवाटप केले.



December 2023


Team Images
Team Images
Team Images


→ नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्थेतर्फे करुणेश्वर वृद्धाश्रम, नेरे येथे फळ वाटप कार्यक्रम.



November 2023


Team Images
Team Images
Team Images


→ कै. नारायण लक्ष्मण तांबोळी यांच्या 12 स्मृतिदिनानिमित्त उपेक्षित घटकांना मदत व्हावी यासाठी मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व जोपासणाऱ्या “कै.नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्थेतर्फे तालुक्यातील बोंडारपाडा आणि तामसई येथील आदिवासी वाडीत दिवाळी फराळाचे वाटप” दिपावली हा सण मोठ्या जल्लोषात रोषणाईत, फटाक्यांची आतिषबाजी करून तसेच नवनवीन वस्तूंची खरेदी करून साजरा करण्यात येतो. हा पारंपरिक दीपोत्सव प्रत्यके घरात आपल्या आर्थिक क्षमतेनूसार साजरा होत असतो. आदिवासी भागांतील पाड्यांवर अनेक सुविधांचा अजूनही अभाव आहे. अशा परिस्थितीत दसरा-दिवाळी सारखे सण मर्यादित स्वरूपात साजरे होतात. मात्र, या आदिवासी बांधवांची दिवाळी यंदा काहीशी आपल्याकडून गोड होणार दिवाळी सणाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीने कष्टकरी व गरजू लोकांना दिवाळी फराळ वाटप करताना गरजू लोंकाचे चेहर्‍यांवरील आनंद पाहता आज खूप समाधान मिळाले.



September 2023


Team Images
Team Images
Team Images


→ Interview Questions for TOP 30 Successful Women. September 2023 issue of Perfect Woman Magazine



June 2023


Team Images
Team Images
Team Images

Team Images

→ मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व जोपासणारी “ नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था” यांच्या वतीने गरजूंना कै. नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजीक संस्थे कडून उपेक्षित घटकांना मदत व्हावी या हेतून आदिवासी भागात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे शालेय साहित्य या विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. गाडेश्वर , वाघाची वाडी, धोदाणी, टावर वाडी शाळा.



Team Images
Team Images
Team Images

Team Images

→ As a Judge at Event: CHARMING Prince & Princess India 2023 (Season VI) at Gurmeet Garha's Grooming School.
    Thanks Gurmit Sir and Siya Madam for this great opportunity.



March 2023

Team Images
Team Images
Team Images

Team Images
Team Images

Team Images

→ प्रिय इव्हेंटस् आयोजित “खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम जागतिक महिला दिना निमित्तशुक्रवार दिनांक 10 मार्च रोजी दुपारी ४.०० वाजता ‘आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंतफडके’ नाट्यगृह पनवेल येथे पार पडला. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी रसिक आंग्रे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या.



Team Images
Team Images
Team Images

Team Images

→ Being honoured by talented actors Alka Kubal-Athalye and Shivaji Satam at Lokmat NAVI Mumbai and Panvel Gaurav 2023.
Also present on the stage Minister of Tourism Maharashtra Mr. Mangal Prabhat Lodha & Lokmat Editor and Chief Mr. Rajendra Darda



January 2023

Team Images
Team Images
Team Images

→ Felicitated with Vaishyakanya award by Mr. Rahul Narvekar, Speaker of the Assembly, Maharashtra State at cultural event organised by Raigad Zilla Vaishya Samaj Mahila Sanghatana



Team Images
Team Images
Team Images

→ Guest of Honour of Annual Day Celebration at S.S.Patil International School Uran (Dronagiri)



December 2022

Team Images
Team Images
Team Images
Team Images

→ As a celebrity guest and Judge at Prarrambh 2k22 Sainath Education Trust Rajiv gandhi college Arts, Commerce and Science Vashi



November 2022


Team Images

→ Grand Opening Ceremony of Tiny n Shiny at Nexus Seawoods



Team Images
Team Images
Team Images
Team Images
Team Images
Team Images

→ Children's Day Celebration at Zilla Parishad School, Vaje.



September 2022



Team Images
Team Images
Team Images